फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांची संघ मुख्यालयात सरसंघचालक भागवत यांच्याशी चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Fadnavis and Chandrakantdada Patil discuss with Sarsanghchalak Bhagwat at Sangh headquarters, discussions abound in political circles

Share This News

नागपूर: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतली सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची भेट. नागपुरात या नेत्यांनी संघ मुख्यालयात सुमारे तासभर सरसंघचालक डॉ भागवत यांच्याशी चर्चा केली. सकाळी साडेआठ वाजता हे नेते नागपुरात संघ मुख्यालयात दाखल झाले व साडेनऊ वाजता चर्चा करून बाहेर पडले. या भेटीबाबत बरीच गुप्तता बाळगण्यात आली होती. चर्चेचा तपशील अद्याप समजू शकला नसला तरी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकिय घडामोडी वर ही चर्चा झाली असावी, असा कयास राजकीय वर्तुळात लावला जातोय.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.