पोलिस बदल्यांच्या रॅकेटचे पुरावे फडणवीस केंद्रीय गृह सचिवांना सादर करणार, सीबीआय चौकशीची मागणी

Share This News

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लाचखोरीचे आरोप झाल्यावर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे पोलिस दलातील बदल्यांच्या रॅकेटचे पुरावे असल्याचा दावा केला असून ते पुरावे केंद्रीय गृहसचिवांना सादर करण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याची घोषणा केली आहे. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची फडणवीस यांची मागणी आहे.
माजी पोलिस महासचालक सुबोध जयस्वाल यांनी पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटसंदर्भातील अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. त्या अहवालाची प्रत आपल्याकडे आहे. याशिवाय पेनड्राईव्ह डेटा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. यात सर्व प्रकारच्या संभाषणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री किंवा आघाडी सरकारने त्या अहवालाची कुठल्याही स्वरुपात दखल घेतली नाही. मात्र, हे रॅकेट उघड करणाऱ्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांची बदली केल्याचे आढळून आले. रॅकेटमध्ये नाव आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप दिले गेले. या रॅकेटमध्ये आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या रॅकेटची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केंद्रीय गृह सचिवांकडे करणार असल्याचे फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.