फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

Share This News

मुंबईः निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकारण केलं जात आहे, शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे, असा थेट हल्लाबोल करत देवेंद्र फडणवीस केली. त्यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक आहे, सेना फक्त प्रस्ताव पाठवते भूमिका काय घेत नाही, ही सगळी नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे सर्व ठरवून करतंय, असं टीकास्त्र फडणवीसांनी शिवसेनेवर सोडलंय.

शिवसेनेनं आता औरंगाबादचं संभाजी नगर करा, असं म्हणायचं. म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खूश होतील. काँग्रेसनं ते करू नका असे म्हणायचे, म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खूश होती. निवडणुका आल्यामुळे नूराकुस्ती आता सुरू झालीय. दोघांनाही या बाबतीत कुठलंही गांभीर्य नाहीये. केवळ हे एक प्रकारचे नाटक सुरू आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय.

मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा औरंगाबादला रस्त्याला पैसे दिले. पण महानगरपालिकेनं ते पैसे वेळेत खर्च केले नाहीत. 100 कोटी देतो असं सांगितलं होतं, पण ते आधीचे पैसे खर्च करू शकले नाहीत. 1600 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याला दिले होते. आता त्याचा वर्कऑर्डर त्यांनी केला. औरंगाबादमध्ये इतकी वर्षं सत्ता चालवूनही कुठलंही महत्त्वाचं काम न करता आल्यानं अशा प्रकारची भाषा या ठिकाणी चाललेली आहे. नुसते पत्र पाठवत असतात, बाकी कुठलीही कारवाई ते करत नाहीत. केवळ निवडणुका आल्यानंतर या गोष्टी का आठवतात, असंही फडणवीस म्हणालेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.