त्या’ व्यक्तीचा राजकीय छळ होऊन नये म्हणून ती धावपळ ..फडणवीस यांचे रिबेरो यांना उत्तर

Share This News

मुंबईः रेमडेसिवीरचा राज्याला पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मालकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळल्यावर आपण विचारपूर्वकच पोलिस उपायुक्त कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. आमच्या विनंतीवरून राज्याला औषधांची मदत करणाऱ्या व्यक्तीचा राजकीय कारणापायी छळ होऊ नये, यासाठी त्याला मदत करणे हे माझे नैतिक कर्तव्य होते. त्यातूनच आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखातून दिले आहे.
माजी पोलिस महासंचालक जे.एफ रिबेरो यांनी या प्रकरणाचा धागा पकडून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची कानउघडणी केली होती. मुख्यमंत्री होण्यासाठी फडणवीस उतावीळ झाले असून त्यापायी ते चुकीची पावले टाकत असल्याची टीका रिबेरो यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीचं कौतूकही केले होते. त्याचा उल्लेख करीत फडणवीस यांनी रिबेरो यांच्या टीकेला उत्तर दिले.
आमच्या विनंतीला मान देऊन ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाने राज्याला रेमडेसिवीर पुरविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या सांगण्यावरून तुम्ही इंजेक्शन्स कसे काय पुरविता, असा जाब सरकारमधील एका मंत्र्याच्या सहायक अधिकाऱ्यानं त्याला विचारला होता. त्याच दिवशी रात्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केल्याने काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आम्हाला आला होता. त्यापायी विचारपूर्वकच आम्ही पोलिस उपायुक्त कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही काही लपून छपून गेलो नव्हतो, याकडे फडणवीस यांनी रिबेरो यांचे लक्ष वेधले. तुमचा स्पष्टवक्तेपणा आणि आपल्या प्रोफेशनबाबत असलेली वचनबद्धता याचा मला नेहमीच आदर राहिला आहे. तुमचा प्रतिवाद मला करायचा नाही. कारण आपल्यात काही तात्विक मतं-मतांतरे असू शकतात. पण प्रत्येक टीका ही मी रचनात्मक पद्धतीने घेतो. पण, महाविकास आघाडीच्या फॅक्टरीने जो चुकीचा प्रचार चालविला आहे, त्याबाबत वस्तुस्थिती सर्वांसमोर ठेवण्याच्या हेतूने आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचे फडणवीस म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.