फेसबुकवर बनावट अकाउंट; पतीवर गुन्हा

Share This News

नागपूर: पत्नीच्या मोबाईलने मित्राच्या नावे फेसबुक अकाउंट उघडून मित्राचे आणि पत्नीचे फोटो अपलोड करणार्‍या पतीवर पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी सुरेश लक्ष्मीचंद सुमन (३७) रा. कोटा राजस्थान याने त्याच्या २५ वर्षीय पत्नीच्या मोबाईलवरून स्वत:च्या मित्राच्या नावे फेसबुकवर एक बनावट अकाऊंट सुरू केले. त्या फेसबुक अकाऊंटवर सुरेश याने पत्नीसह तिच्या मित्र मैत्रिणीचे नाव फोटो टाकले. सोबतच काही अश्लील मेसेजही अपलोड केले. १७ जानेवारी ते ३ मार्च दरम्यान हा प्रकार सुरू होता. पत्नीला याबाबत माहीत होताच तिने यशोधरानगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिस ठाण्यात आरोपी पती विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.