काटोल येथे शेतकरी उत्पादक संघ कार्यशाळा
आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही , यामुळे शेतकऱ्यांची परिस्तिथी दयनीय झाली आहे . माजी कृषिमंत्री रणजित देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाएग्रो एफ पी ओ फेडरेशन व काटोल नरखेड संत्रा उत्पादक संघ द्वरा अरविंद सहकारी बँक ली. सभागृहात आयोजित शेतकरी उत्पादक संघ कार्यशाळेच्या कार्यक्रमा प्रसंगी माजी आमदार आशिष देशमुख अध्यक्षीय भाषणातून बोलत होते .या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी नागपूर रवींद्र ठाकरे उपस्थित होते . शेतकऱ्यांना होणारे फायदे , संघासाठी असलेल्या शासकीय योजना या बदल माहिती देण्यात आली . शेतकऱ्यांचा संत्रा , भाजीपाला विदेशात मोठ्या प्रमाणात कसा विकता येणार याचा सल्ला यावेळी देण्यात आला. यावेळी नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ऑनलाईन च्या माध्यमातून शेतकऱ्यंना मार्गदर्शन केले .