मुख्यमंत्र्याचा ताफा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अडविला

Share This News

ठाकरे यांनी गाडीतुन उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधला

15 वर्षे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.हजार कोटी रुपये खर्चुन शेती तहानलेली असल्याची खंत शेतकऱ्यानी व्यक्त केली . ठाकरे यांनी गाडीखाली उतरून निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले .अचानक ताफा थांबवून शेतकऱ्यांनी गा-हाणे मांडल्याने पोलीस – प्रशासनाची कार्यक्रमस्थळी प्रचंड तारांबळ उडाली.विदर्भासाठी वरदान असणाऱ्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी सव्वादहा वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी करण्याकरिता रवाना झाले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी नजीक असलेल्या गोदीखुर्द धरणाच्या कालव्याची पाहणी करायला आले होते.त्यावेळी ही घटना घडली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.