नागपुरात तीन कैद्यांना कारागृहात एकावर हल्ला

Share This News

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात तीन कैद्यांनी प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने कैदी रोशन शेखवर वार करण्यात आले. हल्ल्यात कैदी गंभीर जखमी झाला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात रविवारी तिघा कैद्यांनी रोशन कयूम शेख याला जबर मारहाण केली. रोशन मकोको कायद्याअंतर्गत गेल्या दहा महिन्यांपासून कारागृहात बंद आहे. रोशन कारागृहातही गुंडगिरी करत असल्याने त्याचे अनेकांसोबत वैर निर्माण झाल्याचे बोलले जाते. रविवारी सकाळी रोशन आंघोळ करून येत असताना वाटेत उभ्या असलेल्या काही कैद्यांना त्याने शिवीगाळ केली. यावरुन संतप्त झालेल्या तिघांनी रोशनवर हल्ला केला. रोशनची धुलाई केल्यानंतर आरोपींनी जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले.
रोशनच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कारागृहातील इतर कैदी आणि सुरक्षारक्षक धावून गेले. त्यानंतर मारामारी करत असलेल्या कैद्यांना दूर करण्यात आले. या हल्ल्यात रोशन गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.