अवैध वाहतूक थांब्याने अपघाताची भीती

Share This News

 पांढरकवडा
येथील राष्ट्रीय महामार्गावरील वाय पॉइर्ंटवर तसेच शिबला पॉइर्ंटवर असलेल्या अवैध प्रवासी वाहतूकीच्या थांब्यावर वाहनांच्या गदीर्मुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात प्रवेश करतानाच दिसणार्‍या ग्रिनसीटी नामक फलकाजवळ या अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांचा थांबा आहे. बसस्थानकाच्या बाजुने तालुका क्रिडा संकुलाकडे जाणार्‍या रस्त्यावरही या वाहनांनी आता आपला डेरा टाकला आहे. बसस्थानकाजवळून क्रिडा संकुलमार्गे जाणार्‍या या रस्त्यावरच आता अवैध प्रवासी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. बसस्थानकाच्या समोरच ही वाहने उभी केली जात असल्यामुळे अनेकदा वाहतूकदेखिल ठप्प होते. याठिाकणी मोठ्या प्रमाणावर काळीपिवळी, कमांडर जीप उभ्या राहतात. या स्थानकावरुन यवतमाळ, वणी तसेच राष्ट्रीय महामागार्ने पाटणबोरीकडे या वाहनांद्वारे प्रवाशांची ने-आण केल्या जाते. परिणामी याठिकाणी प्रवाशांचीही मोठी गर्दी असते. हे स्थानक अत्यंत धोकादायक वळणावर आहे.
वाय पॉइर्ंट परिसरात तसेच बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकदार भर रस्त्यावर आपली वाहने मागेपुढे घेत असतात. आपल्याच वाहनात प्रवासी बसावे, यासाठी वाहनधारकांमध्ये स्पर्धा लागलेली असते. हीच परिस्थिती शिबला पॉइर्ंटवरील अवैध प्रवासी वाहतुकीच्या प्रवासी थांब्याची आहे. त्यामुळे हे थांबे इतरत्र हलविण्यात यावे, अशी शहरवासीयांची मागणी आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.