बाईपणाच्या गोष्ठी
बाईचे लाजणे..!
माझ्या पिढीच्या बायकांच्या हातून काही गोष्टी निसटल्या. तसंच, आजच्या पिढीच्या मुलींच्या
हातून ‘आमच्यात’ असलेल्या काही गोष्टी निसटल्या आहेत. ‘लाजणे’ ही त्यातली एक.
‘मी लाजत नाही,’ असं फार अभिमानाने काही मुली सांगतात. ‘लाजणे’ म्हणजे काहीतरी ‘शर्मनाक़’
काम आहे असा त्यांचा ग्रह आहे. ‘आपल्या स्त्री’चे लाजणे, हा विषय पुरुषाच्या नजरेतून बघावा,
म्हणजे त्यातली गंमत कळते.. एरवी दिवसभर वाघासारख्या भासणाऱ्या मर्दगड्याची अवस्था,
आपल्या बाईचं लाजणं बघून, “तुझ्या नादानं, झालो बेभान, जीव हैरान” अशी होऊन जाते. सुदैवाने
माझ्याकडे ‘मर्दाची नजर’ पण आहे, त्यामुळे हे सारे मी First Hand बघितलेले आहे.
पण ‘लाजणे’ म्हणजे ‘दिसेल त्याला बघून लाजणे’ नाही हां. ते बरोबर नाहीच. तो सरळसरळ
‘सिग्नल’ असतो. पण ज्याला खरोखर ‘सिग्नल’ द्यायचा असतो, त्याला पाहून लाजणे.. आहाहा..!!
टीप: ‘लाजणे’ म्हणजे पुरुषाची गुलामी.. ‘लाजणे’ म्हणजे पुरुषाला रिझवणे.. असलं काही आम्ही
करणार नाही. असा बाणा असणाऱ्यांनी या पोस्टपासून दूर राहावे. त्यांना आयुष्यातले ‘शष्प’ कळत
नाही असं मला वाटतं.
-मिथिला सुभाष