वीज जोडणी तोडू देऊ नका,संघर्ष करा – बावनकुळे | Fight for your electricity connections – Bawankule

Share This News

ज्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्यासाठी महावितरणचे कर्मचारी येतील त्यांना वीज जोडणी तोडू देऊ नका,भाजप अशा वीज ग्राहकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गेल्या 10 महिन्यात ज्यांनी वीजबिल भरले नाही त्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यास महावितरण ने सुरवात केली आहे,मात्र सरकारची ही मोगलशाही असून भाजप याविरुद्ध जोरदार आंदोलन करून सरकारला नामोहरम करू असेही बावनकुळे म्हणाले. राज्यातील सरकार लाखो वीज ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यास निघाले आहे.मागच्या भाजप सरकारने कधीही वीज जोडण्या तोडल्या नव्हत्या, अशातच करोना संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना वीज जोडण्या तोडणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हातून पुढचा हंगामही काढून घेणे असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. वीज बिल माफीसाठी 5 हजार कोटींची व्यवस्था करणे सरकारसाठी मोठी बाब नाही मात्र महाविकास आघाडी सरकार मधील भांडणापोटी जनतेला अडचणीत आणत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला.ऊर्जामंत्री नितीन राऊत वीज बिल माफीची घोषणा करून अडचणीत अडकले आहेत,त्यांनी घोषणा केली मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वीजबिल माफीसाठी निधी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. एकीकडे भाजप वीजबिल माफीसाठी आक्रमक असताना काँग्रेस पेट्रोल दराबद्दल आरडाओरड करीत आहेत. मात्र पेट्रोल वरील राज्य सरकारच्या भरमसाठ कराबद्दल काँग्रेस काहीच बोलत नसल्याचं बावनकुळे यावेळी म्हणाले. नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोल वरील राज्य सरकारचा कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा असंही बावणकुळे यावेळी बोलले. सोबतच भाजप सरकारच्या काळात जिल्हा नियोजन निधीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती त्या निधीत मोठ्या प्रमाणात हे सरकार कपात करीत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.