ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा: मनसेची मागणी

Share This News

कोरोना काळात लोक घरात बंदिस्त असतांना तिप्पट वीज बिल पाठवून व नंतर दिलासा देण्याचा शब्द देऊन आपला शब्द फिरवून महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मनसे नागपूर तर्फे नागपुरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

जास्त वीज बिल आलेल्या ग्राहकांना महावितरणकडून बिलाचे हप्ते पाडून देण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली होती, “लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही बिलं लॉकडाऊनमधील तीन महिन्याची आहेत. लॉकडाऊनमध्ये विजेचा वापर जास्त झाला. टीव्ही, फॅन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढतेच. दुसरी गोष्ट म्हणजे MERC ने एप्रिलमध्ये विजेचे दर वाढवले आहेत. ते दर लागू झाले आहेत. मागील वर्षीच्या या महिन्याच्या बिलाची आणि यंदाच्या बिलाची तुलना करुन पाहिली तरीही हे वीज बिल माफक आहे हे लक्षात येईल”. एवढ्ये आश्वासन देऊन तरी देखील कोरोना काळात नागरिकांच्या घरी MSCB चे वीज विभागाचे कर्मचारी येऊन वीज कापण्याचे सांगतात, तर या आश्वासनाच काय असा प्रश्न देखील उपस्थित होतो.

यावेळी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांना मनसे तर्फे तक्रार देण्यात आली. यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी, जिल्हा अध्यक्ष सतीश कोल्हे व किशोर सरायकर, शहर अध्यक्ष अजय ढोके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.