तहसील कार्यालयात नारे-निदर्शने करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Share This News

नागपूर : कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तहसील कार्यालयात नारे-निदर्शने करणार्‍या लोकांवर नायब तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

२९ जानेवारीला दुपारी १.३0 ते २ वाजेच्या सुमारास आरोपी क्र. लालसिंह सोनीलाल यादव, उज्ज्वल बळीराम रायबोले (४६), प्रतिक चंदु पडोळे (२९) रमेश कृष्णा वैद्य, प्रतीक जाणईव बोबले (२९) अरविंद नामदेव चवडे रा. सर्व कामठी यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नवीन कामठी हद्दीत तहसील कार्यालयातील इमारतीवर चढून नारे-निदर्शने केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.