अखेर बच्चू कडूंना बाहेर पडण्याची अनुमती
शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखून धरलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांना अखेरीस पोलिसांनी बाहेर पडण्याची अनुमती दिली व ते दुपारच्या विमानाने मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखून धरलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांना अखेरीस पोलिसांनी बाहेर पडण्याची अनुमती दिली व ते दुपारच्या विमानाने मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाले. कडू यांना सकाळी ९ विमानाने मुंबईला जायचे होते. आज मुंबईत रिलायन्सच्या समोर होणाऱ्या शेतकरी आंदोलनात ते सहभागी होणार होते. ते थांबलेल्या एरिगेशन डिपार्टमेंट गेस्टहाऊससमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांना सकाळी बाहेर पडू दिले नव्हते. अनुमती दिल्याबद्दल सरकारचे आभार आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाण्याची अनुमती दिल्याबद्दल बच्चू कडू यांनी सरकारचे आभार मानले आहेत. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी, शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा करावा असे मोदीजींना सरकारने सांगावे, असे मत व्यक्त केले.