अखेर संजय राठोड मुख्यमंत्र्यांपुढे हजर |Finally, Sanjay Rathore appeared before the Chief Minister

Share This News

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, पोहरादेवीतील शक्तीप्रदर्शन यामुळे एकापाठोपाठ वादाच्या भोवऱ्यात अडकत चाललेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर शिवसेना कार्याध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे हजर झालेत.
बुधवार, २४ फेब्रुवारीला राठोड नागपूरवरून विमानाने मुंबईत पोहोचले. त्यानंतर त्यांनी थेट वर्षा निवासस्थान गाठले. सुमारे दीड तास येथे राठोड यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेस दोन्ही पक्ष राठोड यांच्यावर नाराज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. राठोड शिवसेनेचे मंत्री असल्यामुळे त्यांच्याबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर काँग्रेस व राष्ट्रवादी दबाव वाढवित आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री राठोड यांच्याबाबत निर्णय घेतील असे शिवसेनेच्या गटातून सांगण्यात येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.