३१ डिसेंबरला फटाके बंदी; अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जाल!

Share This News

नागपूर
नवीन वर्षाचे स्वागत करताना नागपूर महानगर व जिल्ह्यात प्रतिबंधित व शांतता क्षेत्रात फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली. सोबतच या काळासाठी जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ तारखेला फटाक्याच्या लडी, अधिक आवाज करणारे फटाके फोडणार्‍यांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
नूतन वर्ष साजरे करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लोक मोठय़ा प्रमाणात फटाके उडवितात व फोडतात. यामुळे रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन शांततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक हिताच्या आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी १ जानेवारी २0२१ पर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ जिल्ह्यात लागू केली आहे.
उत्सवाच्या काळात या आदेशाचे उल्लंघन करणारा व्यक्ती कलम १८८ मधील तरतुदीनुसार कायदेशीर शिक्षेस पात्र राहील. शहरातील पेट्रोल पंप, सिलेंडर, गोडाऊन, केरोसीन तेलाचे डेपो, फटाक्याची दुकाने, ज्वालाग्राही पदार्थांचे डेपो, रासायनिक पदार्थांचे डेपो, दुकाने वस्ती अथवा बाजारपेठेत आहेत तेथील स्थानिक लोकांकडून व्यापार्‍याकडून सदर ठिकाणाजवळ फटाके व राकेट इत्यादी फोडले गेल्यास फटाक्यांची ठिणगी पडून त्याद्वारे स्फोट होऊन मोठय़ा प्रमाणात आग लागण्याची व जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व ठिकाणी २00 फुटाचे आत फटाके उडविण्यास मनाई करण्यात आली आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.