आधी लिफ्ट दिली नंतर लुटले; नागपुरातील घटना First lifted then robbed; Incidents in Nagpur

Share This News

नागपूर : पेट्रोल संपल्याने अडचणीत सापडलेल्या एकाला तीन युवकांना लिफ्ट देत आधी उदारता दाखविली. पेट्रोल पंपापर्यंत जाण्यास या व्यक्तीला मदत केली. मात्र पेट्रोल पंपावर येताच चाकुच्या धाकावर या व्यक्तीला तिघांनीही लुटले.


नागपूर-वर्धा मार्गावर असलेल्या हॉटेल ली-मेरेडियनकडून खापरीकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. २ मार्चच्या मध्यरात्री जितेंद्र बाबुलाल मलिक (वय ३५, रा. बांदा, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम खापरी पुनर्वसन) हे एम.एच.३१- सीवाय-८४८५ क्रमांकाच्या दुचाकीने वर्धा मार्गाने जात होते. त्यावेळी हॉटेल ली-मेरेडियनकडून पुनर्वसन खापरीकडे जाणाऱ्या मार्गावर त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. याच रस्त्यावरून तीन तरुण पल्सरने जात होते. त्यांनी मलिक यांना लिफ्ट दिली. एकाने जितेंद्र यांना दुचाकीवर बसविले. दोघेजण त्यांची दुचाकी पकडून पेट्रोल पंपापर्यंत आले. मलिक यांना त्यांनी पेट्रोल भरू दिले. जितेंद्र यांनी पेट्रोलचे पैसे देऊ केल्यानंतर या तरुणांनी आपले रंग बदलले. त्यांनी चाकू काढला व मलिक यांना धमकावले. त्यानंतर दुचाकीसह त्यांच्याजवळचे पैसे, मोबाइल हिसकावला. त्यांनी विरोध केल्यानंतर युवकांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी मलिक यांच्या तक्रारीच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.