लग्नाच्या वऱ्हाडाला झालेल्या अपघातात पाच ठार, वीस जखमी|Five killed, 20 injured in wedding accident

Share This News

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथून एकारा येथे परत जात असलेला वरातीचा मिनी ट्रक कच्चेपार गावाजवळ उलटून झालेल्या अपघातात ५ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतकांमध्ये साहिल कोराम (वय १४), रघुनाथ कोराम (वय ४१), कवीता संजय बोरकर (वय ३५), वीणा घनश्याम गहाणे (वय २६) व वैभव लोमेश सहारे (वय ३०) यांचा समावेश आहे. मिनी ट्रकमध्ये सुमारे ५० वऱ्हाडी बसले होते. त्यातील सुमारे २० वऱ्हाडी अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. परिसरातील अरसोडे कुटुंबीय विवाहासाठी बोदरा येथे जात होते. वऱ्हाड, स्थानिक नागरिक आणि मार्गावरील वाहनधारकांनी तातडीने मदत करत जखमींना सिंदेवाही रुग्णालयात दाखल केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.