स्वच्छता कर्मचाऱ्याच्या हस्ते पोलीस स्टेशनमध्ये ध्वजवंदन

Share This News

२६ जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सरकारी कार्यालयात मान्यवरांनी तिरंग्याला मानवंदना दिली. मंत्र्यांपासून शासकीय अधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केलं. अशात  नागपूर जिल्ह्याच्या मौदा पोलीस स्टेशन मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. स्वच्छता कामगार नसते तर सगळीकडे कचराकुंड्या ओसंडून वाहत असत्या,रोगराईचे साम्राज्य असते. एक दिवस स्वच्छता कर्मचारी परिसरात  आले नाही तर नागरिकांची मोठी गैरसोय होते. अश्या या स्वच्छता कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मौदा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे  यांनी पुढाकार घेतला. मौदा पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत असलेले स्वप्नील चौधरी यांना पोलीस स्टेशनमधील ध्वजवंदन करण्याचा मान देण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी  बंदोबस्तासाठी नागपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. काम कुठलेही असो ते कमी लेखात कामा नये व याच भावनेतून स्वच्छता कर्मचारी स्वप्नील चौधरी यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदना करण्याचा मान देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी सांगितले. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.