संघ मुख्यलयात महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न
नागपूर:-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात आज गणतंत्र दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आलं. सरसंघचालक मोहन भागवत आणि सहकार्यवाह भय्याजी जोशी प्रवासात असल्याने महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं, यावेळी संघमुख्यालयातील पोलीस कर्मचारी आणि संघ स्वयंसेवक उपस्थित होते.
देशात सर्वत्र गणराज्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही गणराज्य दिन साजरा करण्यात आला. अत्यंत साध्या पद्धतीने ध्वजारोहणाचव कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारकही उपस्थित होते.
यासोबतच डॉ. हेडगेवार स्मारक समितीतर्फे रेशीमबाग परिसरातील स्मृती मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्मृती मंदिर परिसरात संघाचे महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी सकाळी 9 वाजता ध्वजारोहण केले. यावेळी डॉ. अभय दातारकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.