राज्यातील यवतमाळपाठोपाठ अमरावती जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर

Share This News

अमरावतीः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालाय. रविवारीपासून जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय. त्यामुळे अमरावती जिल्हात रविवारी लॉकडाऊनची घोषणा झालीय. (Lockdown Has Also Been Announced In Amravati District)

चार दिवसांपासून अमरावतीत कोरोना रुग्णांत वाढ

गेल्या चार दिवसांपासून अमरावतीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून, 14 फेब्रुवारीला 435 रुग्ण सापडले असून, दोन जणांचा मृत्यू झालाय, तर 15 फेब्रुवारीला 439 रुग्ण सापडले असून, 4 जणांचा मृत्यू झालाय. तसेच 16 फेब्रुवारीला 495 रुग्ण सापडले असून, 17 फेब्रुवारीला 498 रुग्ण सापडलेत, तर 6 जणांचा मृत्यू झालाय.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.