*प्रसिद्धी साठी *

Share This News

आज नागपूर रेल्वे स्थानक येथील लोकगर्जना ऑटो चालक मालक संघटना , नागपूर रेल्वे स्टेशन कूली, ऑटोचालक सेवा संस्था तर्फे रेल्वे स्टेशन प्रीपेड बूथ येथे ऑटो चालक तथा कूली बांधवांसाठी मेडिकल मास्क व होमिओपॅथिक ची कोरोना पासून बचाव करण्यासाठी औषधी चे वितरण नागपूर रेल्वे स्टेशन चे स्टेशन मास्टर श्री दिनेश नागदिवे, समाजनिक कार्यकर्ते व वन कर्मचाऱ्यांचे नेते श्री अजय पाटील , रेल्वे चे ठाणेदार श्री मीना, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजयकुमार मालवीय, साहेबराव सिरसाट , प्रीपेड चे संचालक श्री अल्ताफ अन्सारी यांच्या हस्ते पार पडले.
कोरोना च्या काळात कूली आणि ऑटोचालकांची खूप उपासमार झाली व त्यावर त्यांनी मात केले व पुनछ उभे राहिले हे अभिनंदनीय आहे असे श्री अजय पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये नमूद केले. श्री मीना व श्री नागदिवे यांनी रेल्वे प्रशासनाकडून पुढे सुद्धा सहकार्य करू असे आश्वासन दिले. पोलीस निरीक्षक श्री अजयकुमार मालवीय यांनी ऑटोचालक व कूली यांचे नागरिकांसाठी मोठे योगदान आहे असे म्हटले.
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सर्वश्री अल्ताफ अंसारी, अस्लम खान, एकिम भाई , प्रदीप पाटील, शाम धामगाये,प्रदीप नागदेवते, निसार अहमद , शेख हनीफ यांनी मेहेनत घेतली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.