पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात लस रवाना

Share This News

ज्या कोरोनाविरोधी लशीची संपूर्ण देश वाट पाहत होता. ती कोरोनाविरोधी लस अखेर आली आहे.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटट ऑफ इंडियामधून कोव्हिड-19 लशीची पहिली खेप रवाना करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सिरम इंन्स्टिट्युटमधून कोरोना विरोधी ‘कोव्हिशिल्ड’ लस देशातील विविध राज्यांसाठी पुणे एअरपोर्टकडे रवाना करण्यात आली. पण, ही लस कोणत्या राज्यांकडे रवाना करण्यात आली याबाबत सीरम इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळू शकलेली नाही.

16 जानेवारीपासून देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून लशीची पहिली खेप रवाना करण्यात आली. लस देशभरात वितरीत केली जाणार आहे. लस कोणत्या राज्यांना पाठवण्यात आली याबाबत सिरमकडूनच माहिती मिळू शकेल. पोलिसांनी लस घेऊन जाणाऱ्या ट्रकना एअरपोर्टपर्यंत सुरक्षा देण्याचं काम केलं.”

भारतात पहिल्या टप्प्यात कोव्हिड वॉरिअर्सना लस दिली जाणार आहे. देशभरातील कोरोनाविरोधी लढ्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना 16 जानेवारीपासून लस देण्याची मोहीम सुरू केली जाईल.

मंगळवारी सकाळपासूनच सीरम इन्स्टिट्युटमध्ये लशीचे बॉक्स ट्रकमध्ये भरण्याचं काम सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार, लस घेऊन जाणाऱ्या ट्रकना आतून सॅनिटाईज करण्यात आलं आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.