अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा | Finally, Forest Minister Sanjay Rathore resigned

Share This News

शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड   यांना आपला राजीनामा मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्याकडे  पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव आल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारत राठोडांनी आपला राजीनामा पाठवला असल्याची माहिती आहे.  परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारणार का, भाजपच्या मागणीनुसार राठोडांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, असे प्रश्न अजूनही कायम आहेत. 
मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा आहे. राठोड यांनी राजीनामा देऊ नये, असे सेनेतील एका गटाचे म्हणणे आहे. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.