मुलांनो आम्हाला माफ करा; उमरेडमध्ये दाम्पत्याची आत्महत्या

Share This News

 उमरेड
शहरातील हार्डवेअरचे व्यापारी राजेश सोहनलाल गुप्ता यांनी पत्नीसह आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (१२ फेब्रुवारी) उघडकीस आली. आजारपण आणि त्यातून उद्भवलेल्या आर्थिक चणचणीतून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, या हृदय हेलावून टाकणार्‍या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. राजेश सोहनलाल गुप्ता (वय ६९) व संध्या राजेश गुप्ता (वय ५५), रा. वैष्णवी कॉम्प्लेक्स, नागपूर अशी मृतक दाम्पत्याची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, गुप्ता दाम्पत्य वैष्णवी कॉम्प्लेक्सच्या तिसर्‍या माळ्यावर राहत होते. त्यांचा मुलगा विजय याने वडिलांना फोन केला. परंतु, उचलत नसल्याने मित्राला घरी जाण्यास सांगितले. मित्राने घरी जाऊन बघितले असता दरवाजा उघडा होता. यावेळी मित्राचे आई-वडील दोघेही मृतावस्थेत आढळून आले. तोंडाला फेस आला होता. त्याने तत्काळ पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. मृतक राजेश यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या नावे चिठ्ठी लिहून आम्ही दोघे स्वर्मजीने आत्महत्या करीत असून, याला कुणालाही जबाबदार धरू नये. मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करण्यात यावे, असे लिहिले. तसेच बंद लिफाफ्यात मुलीला चिठ्ठी लिहिली आहे. बातमी लिहिस्तोवर आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मुलगी विवाहित असून, मुलगा नागपूर येथे राहात आहे. ठाणेदार यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.