कॉंग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन

Share This News

वसई, ३ मे : कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व डहाणू मतदार संघाचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते. वसई येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.
राजकीय कारकीर्द
शिंगडा यांनी १९७९ मध्ये प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. ते ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष होते. ते वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले त्या वेळेपासून आजतागायत गांधी घराण्यासी एकनिष्ठ होते. १९८० मध्ये ते प्रथम डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर याच मतदारसंघातून ते १९८४, १९८९, १९९१ व २००४ असे पाच वेळा निवडून आले. त्यांनी 
शेतीनिष्ठ शेतकरी म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. त्यांनी अनेक वर्षे कॉंग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्षपदाची धुरा वाहिली होती. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांना अजात शत्रू म्हणून ओळखले जात होते. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.