१८ गावांतील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मंजूर झालेली विकास कामे सुरू करा – माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर.

Share This News

कल्याण, ६ नोव्हेंबर : १८ गावे वगळण्यात आल्याने काही नगरसेवकांचे कार्यकाळ पूर्ण व्ह्यायच्या आतच पद गेली. त्याचा फटका भाजपाचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनाही पडला.मात्र कुठेही खचून न जाता त्यांनी आपले काम चालू ठेवले आहे. १८ गावतील समस्या सोडवण्यासाठी त्यांचा पत्रव्यवहार आणि पाठपुरावा चालू आहे. महापालिकडे त्यांनी काही मागण्या केल्या असून याबाबत त्यांनी केडीएमसी आयुक्त, महापौर, सभापती आणि सचिवांकडे पत्रव्यवहार सुद्धा केला आहेत.
सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने २७ गावांमधून मोठया प्रमाणावर महसूल जमा केलेला आहे आणि आजही नागरीक मालमत्ता कराचा भरणा करीत आहेत. त्यामुळे महापालिका मधून वगळलेल्या १८ गावातील विकास कामे करण्यास मनाई करणे हे करदात्या नागरीकांवर अन्याय करणारे आहे. सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात १८ गावातील सन्मा.पालिका सदस्यांचा पदावधी होता आणि त्यामुळे नगरसेवकांनी प्रभागातील नागरीकांना अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणेसाठी नगरसेवक निधीमधून कामे सूचविलेली होती. त्यामधील निविदा प्रक्रीया पूर्ण होऊन मंजूर झालेली विकास कामे, कार्यादेश ( Work Order ) न दिल्यामुळे कामे सुरू होऊ शकली नाहीत. १८ गावातील पालिका सदस्यांनी सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील नगरसेवक निधीमधून सूचविलेली व निविदा प्रक्रीया पूर्ण होऊन मंजूर केलेली विकास कामे सुरू करणे आणि कामाचे कार्यादेश ( Work Order ) देणेबाबत संबंधीत विभागास आदेश देण्यात यावेत अशी मागणी भाजप माजी नगरसेवक आणि उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केडीएमसी आयुक्त, महापौर आणि सभापती यांच्याकडे केली आहे.तसेच राज्य शासनाने महापालिका हद्दीतील २७ गावापैकी वगळलेल्या १८ गावातील मूलभूत सोयी सुविधा महापालिका प्रशासनाने पुरव्यात असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिलेले आहेत. त्यानुषंगाने प्रभाग क्र.१०७ मधील दैनंदिन साफसफाई केली जात नाही. रस्त्यावरील घनकचरा उचलणेकरीता असलेले जेसीपी व डंपर बंद केलेले आहेत. त्यामुळे प्रभागात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. तसेच रस्त्यावरील रोडलाईट व दिवाबत्ती बंद असल्यामुळे नागरीकांना विशेषतः महिलांना रात्रीच्या वेळी अंधारातून चालावे लागते. प्रभागातील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने त्या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत. तसेच प्रभागातील काही भागात अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांची पाण्यावाचून गैरसोय होत आहे.तरी प्रभाग क्र.१०७ मधील दैनंदिन साफसफाई ,रस्त्यावर साठलेला घनकचरा, बंद ठेवलेले जेसीपी व डंबर, रस्त्यावरील खड्डे भरणे व बंद असलेली रोड लाईट आणि टंचाईग्रस्त भागातील पाणी पुरवठा सुरळीत करणे इत्यादी कामे पुर्ववत चालू करणेबाबत संबंधीत विभागास लेखी आदेश द्यावेत आणि कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना मृत्यु झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी माजी नगरसेवक मोरेश्वर यांनी केली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.