महावितरणच्या पदभरतीसाठी माजी ऊर्जामंत्र्यांचे आंदोलन

Share This News

उद्या नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने

राज्य वीज कंपनीतील रिक्त पदांसाठी बोलावलेल्या अर्जातून पात्र उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया जाणिवपूर्वक संथगतीने पार केली जात असल्याचा आरोप करून राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात तातडीने पावलं उचलली न गेल्यास मंगळवारी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, महावितरणमधील पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक आणि 412 शाखा अभियंत्यांता पदाच्या परीक्षा होऊन आणि अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही निवड यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे.या सर्व पदांच्या नियुक्तांबद्दल महावितरणने निर्णय घ्यावा अन्यथा 3 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी ऊर्जामंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहे. यापूर्वी घोषित त्यांचे आंदोलन तूर्तास मागे घेण्याची विनंती महावितरणने केली होती. या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविले असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांनी म्हटले होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.