माजी गृहामंत्र्यांच्या चौकशीत आले मंत्री अनिल परब यांचे नाव, राणे यांचा दावा

Share This News

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीत राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांचे नाव घेतलं असल्याच्या दावा माजी मुख्यमंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत बोलताना केला आहे. अलीकडेच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाचारण करून त्यांची तब्बल नऊ तास चौकशी केली होती. या चौकशीत अनिल परब यांचे नाव आले असल्याचा दावा राणे यांनी केला आहे. आता चौकशीसाठी अनिल परब यांचा नंबर असून त्यांना सीबीआय उचलून नेईल, असे राणे म्हणाले. सीबीआय चौकशीचा अहवाल पंधरा दिवसात सादर होणार असल्याने त्यात लवकरच अनिल देशमुख आणि अनिल परब यांचा खरा चेहरा उघड होईल, असेही राणे यांनी म्हटले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.