माजी केंद्रीय मंत्री बुटा सिंग यांचे निधन former minister Buta Singh passed away

Share This News

नवी दिल्ली, 02 जानेवारी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे शनिवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. त्यांनी गृहमंत्री, कृषीमंत्री, रेल्वेमंत्री यांसह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. ते काही काळ बिहारचे राज्यपालही होते.  बुटा सिंग यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचार सुरू असताना शनिवारी,2 जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूळचे पंजाबचे खासदार असलेले बुटा सिंह काही काळ राजस्थानमधूनही खासदार होते. दलित नेता असलेले बुटा सिंह राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष होते.

बुटा सिंग यांच्या निधनाचे वृत्त कळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. बुटा सिंह एक उत्तम प्रशासक होते आणि गरीबांच्या कल्याणासाठी झटत होते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुटा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. तर एक जनसेवक आणि निष्ठावान कार्यकर्ता गमावला अशा शब्दात राहुल गांधी यांनी शोक प्रकट केला. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.