माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन, कोरोनाची झाली होती लागण

Share This News

चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन झाले आहे. देवतळे  4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.  त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रीपदाचा भारही सांभाळला होता.

2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता, पण त्यांचा पराभव झाला. 2019 साली  शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती, मात्र पुन्हा पराभूत झाले. नुकतेच केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

कौटुंबिक सदस्य बाधीत निघाल्यावर देवतळे यांनी चाचणी केली होती. त्यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळले होते. गेले 6 दिवस नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.