इंधनदराबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे आवाहन

Share This News

नागपूर : इंधनाचे दर गगनाला भीडले आहेत. त्यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर राज्य सरकारही कर लावते. ही करप्रणाली सुटसुटीत करण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील सरकारने पक्षीय राजकारण बाजूला ठेवत केंद्र सरकारसोबत यावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार डॉ. विकाम महात्मे, नागपूर भाजपचे अध्यक्ष प्रवीण दटके आदी यावेळी उपस्थित होते. नागपुरातील पत्रकार क्लब येथे शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रभू म्हणाले की, इंधन दरवाढीबाबत राजकारण करणे योग्य नाही. सामान्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक पाऊल पुढे येणे गरजेचे आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प चांगला आहे. यंदाचे वर्ष कोरोनामुळे पूर्णपणे कुलुपात गेले. त्यामुळे सामान्यांना कसा दिलासा देता येईल, याचा प्रयत्न सीतारामण यांनी केला आहे. केंद्रातील एनडीएचे सरकार सामान्यांच्या हितासाठी काम करीत आहे. त्याला विविध राज्यातील सरकारने साथ देणे गरजेचे आहे, असे प्रभू म्हणाले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.