८८ वर्षीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी कोरोनावर केली मात

Share This News

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. यानंतर त्यांना ‘एम्स’ रुग्णालयातून आज (गुरुवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. १९ एप्रिल रोजी ८८ वर्षीय मनमोहन सिंह कोरोंना संक्रमित असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तातडीनं त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंह यांचा ताप आल्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत ते  कोरोंना पॉसिटीव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं. मनमोहन सिंह यांनी ४ मार्च तसंच ३ एप्रिल रोजी करोना कोरोंना लसीचे  घेतलेले होते. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही माजी पंतप्रधान मनमोहन सिंह कोरोना संक्रमित आढळले होते. मात्र, ८८ वर्षीय मनमोहन सिंह यांनी कोरोनावर मात केल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.