बल्‍लारपूर,पोंभुर्णा भागासाठी चार रूग्‍णवाहीका उपलब्‍ध होणार

Share This News

आमदार सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार

चंद्रपूर: विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री यांच्‍या पुढाकाराने त्‍यांच्‍या स्‍थानिक विकास निधीतुन बल्‍लारपूर, मुल आणि पोंभुर्णा येथील शहरी व ग्रामीण भागासाठी चार रूग्‍णवाहीका लवकरच उपलब्‍ध होणार आहे.
चंद्रपूर जिल्‍हयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रूग्‍णसंख्‍येत मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. अनेक ठिकाणी रूग्‍णवाहीकेअभावी रूग्‍णांचे हाल होत आहेत. त्‍यामुळे यासंदर्भात उपाययोजना म्‍हणुन आ. सुधीर मुनगंटीवारांनी पुढाकार घेत चार रूग्‍णवाहीका आमदार निधीतुन उपलब्‍ध करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यांच्‍या या पुढाकारामुळे मुल, बल्‍लारपूर आणि पोंभुर्णा या भागातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्‍ध होणार आहे.
गेल्‍या वर्षभरापुर्वी उदभवलेल्‍या कोरोनाच्‍या पहील्‍या लाटेपासुन लॉकडाउनच्‍या कालावधीत आ. सुधीर मुनगंटीवारांनी भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन गोरगरीब नागरिकांसाठी फुड पॅकेटचे वितरण, सॅनिटायझर, मास्‍क चे वितरण, पोस्‍टमन व पोलीस बांधवांसाठी सुरक्षा किटचे वितरण, रूग्‍णांना ने-आण करण्‍याकरिता रूग्‍णवाहीकेची सोय, सार्वजनिक ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशिनचे वितरण, गोरगरीबांना जिवनावश्‍यक वस्‍तु तसेच अन्‍नधान्‍याच्‍या किटचे वितरण, मजुरांना स्‍वगावी पोहचविण्‍यासाठी बसेसची सोय आदी माध्‍यमातुन सेवाकार्य केले. आता आमदार निधीतुन रूग्‍णवाहीका उपलब्‍ध करत नागरिकांना आरोग्‍य सेवा पुरविण्‍याचा त्‍यांचा पुढाकार महत्‍वपूर्ण ठरला आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.