हल्दीरामच्या नावे वेबसाइटवरून फसवणूक

Share This News

नागपूर : उपराजधानातील नामांकित खाद्यान्न ब्राण्ड असलेल्या हल्दीरामच्या नावे फसवणूक होत आहे. हल्दीरामच्या संकेतस्थळाशी साधर्म्य असलेल्या संकेतस्थळावरून ही फसवणूक होत आहे. त्यामुळे या संकेतस्थळांची नोंदणी रद्द करण्यात यावी, अशा आशयाचा विनंती अर्ज हल्दीरामने दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.
हल्दीरामचे वकील महेंद्र लिमये यांनी दाखल केलेल्या विनंती अर्जानुसार www.haldirams.com, www.haldirams.in, www.haldiram.com, www.haldiramfranchise.com या संकेतस्थळांवरुन हल्दीरामच्या नावे पैसे उकळण्यात येत आहेत. ही संकेतस्थळे गो डॅडी, नेटवर्क सोल्यूशन्स आणि निक्सी या ‘डोमेन’वरून तयार झाली आहेत. या ‘डोमेन’ने या संकेतस्थळांची नोंदणी रद्द करावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. हल्दीराम व्यवस्थापनाला यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी न्यायाधीश नायगावकर यांनी गो डॅडी, नेटवर्क सोल्यूशन्स आणि निक्सी या ‘डोमेन्स’ला नोटीस बजावली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.