भयावह…कोरोनाच्या संकटातही अमरावतीत गर्दी आवरेना..

Share This News

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खरेदीसाठी सूट देण्यात आली आहे. अशात अमरावतीच्या मुख्य भाजी बाजारपेठेत मात्र व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी कोरोना नियमांचा फज्जा उडविला आहे.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी भाजी बाजारपेठ म्हणून अमरावतीच्या भाजी बाजार पेठेकडे पाहिले जाते. या बाजारपेठेत पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील अनेक शेतकरी, व्यापारी आपला शेतमाल घेऊन येतात. परंतु या बाजारपेठेत मात्र कोरोना नियमांचे कुठलेही पालन होताना दिसत नाही. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मृत्यूचा आकडाही वाढत आहे. असे असताना बाजारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणणे पोलिसांना जमलेले दिसत नाही. कोरोनाची दुसरी लाट धोकादायक स्थितीत असताना खरेदीसाठी गर्दी होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमरावतीतील इतवारा भागात या लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडालेला आहे. नेहमीप्रमाणे येथील व्यावसायिकांनी आपले दुकानच थाटले होते. त्यामुळे अमरावतीतल्या एका भागाला वेगळा नियम आणि अमरावतीला इतवारा भागाला वेगळा का, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.