उपराजधानीत पुन्हा इंधनदरवाढ

Share This News

नागपूर : पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा भडका उपराजधानी नागपुरात कायम आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवार, २० फेब्रुवारीपासून नागपुरात पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले आहे.
पेट्रोलियम पदार्थ विक्रेता असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारीला नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर ९७.१३ रूपये होता. हा दर शनिवारी ९७.५१ रुपये प्रति लिटर झाली आहे. डिझेलचा दर १९ फेब्रुवारीला ८८.२२ रुपये प्रति लिटर होता. शनिवारी हा आकडा ८८.६२ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे लवकरच शहर बस वाहतूक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुकीच्या तिकीट दरात वाढ होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहे. डिझेलचे दर वाढल्याने देशांतर्गत होणाऱ्या मालवाहुकीचे दर वाढण्याची शक्यता माल वाहतूक संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महागाई वाढण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. इंधन दरवाढीच्या विरोधात एकीकडे काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारच्या करप्रणालीमुळे इंधन महाग असल्याचा प्रत्यारोप भाजपने केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या या राजकीय वादात मात्र सर्वसामान्य वाहन चालक भरडल्या जात आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.