अमरावती मेडिकल कॉलेजचा निधी कोकणात पळवला, विदर्भवाद्यांचे आंदोलन
अमरावती येथील सरकारी मेडीकल महाविद्यालयाला ताबडतोब निधी देऊन महाविद्यालयाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अमरावती येथील जिल्हा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अमरावती येथील सरकारी मेडीकल कॉलेज २०१६ मध्ये महाराष्ट्र सरकार ने प्रस्तावित केले होते. भाजपा सरकारने या कॉलेज साठी निधी आवंटीत केला नाही व त्यानंतर राज्यात आलेल्या उध्दव ठाकरे सरकारने देखील यासाठी निधी उपलब्ध केला नाही. या उलट महाविकासआघाडी सरकारने पश्चिम विदर्भातील अमरावतीच्या एकमेव सरकारी मेडीकल कॉलेजला अग्रक्रमाने निधी उपलब्ध न करुन देता कोकणातील सिंधुदुर्ग व अलीबाग येथील कॉलेजला अग्रक्रम देऊन पश्चिम विदर्भाच्या जनतेवर मोठा अन्याय केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. अमरावती मेडीकल कॉलेजला त्वरीत निधी उपलब्ध करुन कॉलेजचे त्वरीत काम सुरु करावे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्हा कार्यालयासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विशाल धरणे आंदोलन आयोजित केले होते.
राम नेवले (संयोजक,विदर्भ राज्य आंदोलन समिती )