शहीद जवान भूषण सतई यांच्यावर आज काटोल येथे अंत्य संस्कार

Share This News

https://www.facebook.com/Shankhnaad.Live

काटोल शहरातील व तालुक्यातील आपले सर्वांचे शिरोमणी ठरलेले जम्मू काश्मीर राज्यातील गुरेज सेक्टर मध्ये भारतीय सेनेत कार्यरत नायक भुषण रमेश सतई हे पाकिस्तान कडुन झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले त्यांचे पार्थिव उद्या सकाळी ८ वाजता काटोल येथील निवासस्थान येणार असून त्यानंतर सकाळी १० वाजता शहिद भुषण यांचे श्रीकृष्ण नगर फैलपुरा निवासस्थानाहुन अंत्ययात्रा निघणार असुन नगरभव, जैन मंदिर चौक, स्टेट बँक चौक – रुईया हायस्कूल चौक – गर्ल्स होस्टेल – गुरांचा दवाखाना – गळपुरा – दोडकीपुरा – आंबेडकर चौक – हुतात्मा स्मारक – पोलीस स्टेशन-अंबालाल पटेल बिल्डींग – सरस्वती महाद्वार चौक – बस स्टँड – रेस्टहाऊस – धवड पेट्रोल पंप – यादव पेट्रोल पंप आणि दहन स्थळ
शहीद नायक भूषण सतई याच्या वीरमरणाने काटोलात शोककळा पसरलेली असतानाच फुलू पाहणाऱ्या स्वप्नांचाही अकाली अंत झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

दारिद्र्यरूपी अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करू पाहणारे सतई कुटुंब पुन्हा एकदा दु:खाच्या खोल गर्तेत गेले आहे.शहीद जवान भूषण सतई याच्या वीरमरणाने काटोलात शोककळा पसरलेली असतानाच फुलू पाहणाऱ्या स्वप्नांचाही अकाली अंत झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

अक्षरश: अठराविश्वे दारिद्र्य पाहिलेल्या या कुटुंबासाठी भूषणचे लष्करात नोकरीला लागणे प्रचंड अभिमानासह सर्वांच्याच आयुष्याला कलाटणी देणारे होते. देशसेवेसोबतच आई-वडिलांचे उत्तरपर्व सुखमय करण्याचा संकल्प भूषणने केला होता. स्वप्नरूपी कळ्या फुलू लागल्या होत्या. तेवढ्यातच काळाने घाला घातला आणि होत्याचे नव्हते झाले. भूषणचे वडील रमेश धोंडू सतई (वय ६०) हे शेतमजुरी करायचे. मुलगा भारतीय सैन्यात लागल्यानंतर त्यांनी मजुरी करणे सोडून दिले. भूषणचा लहान भाऊ लेखनदास आणि बहीण सरिता हे दोघेही बेरोजगार आहेत. घरी रमेश आणि त्यांचे चार भाऊ मिळून १.६६ हेक्टरइतकी शेती लिंगा येथे आहे. अत्यंत हलाखीचे दिवस काढणाऱ्या सतईंसाठी भूषण हा खऱ्या अर्थाने आशेचा किरण होता. महिन्याभरापूर्वी भूषण रजा घेऊन गावी आला होता. यादरम्यान त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. सुचविण्यात आलेल्या स्थळानुसार मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मात्र, लग्नाची गोष्ट पुढे न सरकल्यामुळे त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे हे जाणे पार्थिवरूपाने परतणे ठरेल, असा कुणीही विचार केला नव्हता.

आईवडिलांसाठी ‘तो’ जखमी

भूषणचे जाणे आई-वडीलांना धक्कादायक ठरेल, या भीतीपोटी त्यांना रविवारपर्यंत मृत्यूबाबत काहीही सांगण्यात आले नाही. भूषण दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झाला असून सुखरूप असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्याचे पार्थिव अंगणात पाहिल्यानंतर काय होईल, हा विचारही करू शकत नसल्याची भावना लहान भाऊ लेखानदास याने व्यक्त केली. त्याने अत्यंत जवळच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी बोलावून घेतले आहे. गावातील समाज भवनात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था गावकऱ्यांद्वारे करण्यात येत आहे.

शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार

भूषणचे पार्थिव रविवारी सायंकाळी ५ वाजतादरम्यान दिल्ली येथून नागपुरात आणण्यात आले. आज, सोमवारी कामठी येथे सकाळी ८ वाजता भारतीय लष्कराद्वारे गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल. त्यानंतर पार्थिव काटोल येथे नेऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , पालकमंत्री नितीन राऊत  , गृहमंत्री अनिल देशमुख   जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.