एका काडीमोडाची गोठ…

Share This News

निवेदक : रामराम मंडयी, य दिसानं भेट व्हत हाय, का हाय का हंगामात होतो. गुह बरा झाला यंदा त अवकाली पानी आला. हे असेच झमेले राह्यतेत आजका मांग. आता आमचं गाव न तेच्यात काही गावझमेले नही असं व्हतच नाही. बरं आपून म्हनजे सारा गाव मामाचा न एक नाही कामाचा, असे हाव. एक त आमचं गाव म्हंजे सबतरफ देख न हम है एक असाच हाय. म्हजे कोनाचन काहीबी दुखल खुपलं का सार्‍या गावाले समजते न हरेकजन थे आपलाच प्राब्लेम हाय अस समजून काम करते. त्यापायी लयदा लोचा अखीनच वाढत जाते. आता पाहाना वामन आन रेखीत झाला गैरसमज मंग थे आला शांताबाईच्या चावडीवर. मले म्हंजे कौतिकले शांताबाईनं बलावलं. मग का हाय सार्‍या गावाले क्षनात खबर झाली. मंग हा लोचा झाला हे पहाच ना तुमी. आपलं का हाय हा एखांदी केस आपल्या हाती आली त आपून आधी इच्चू चढवतो न मंग उतरवतो. तेच्यात वामन्या म्हंजे खेटे घ्याले अनंद देनार मानूस… पहाच ना का झालं थे… राती क वाजले असीन
त रेखी शांताबाईकडं रडतच आली.

(म्युझीक आणि मग सीन बदलतो.)
शांताबाई : गोविंदा, अरे थे गोरीचं वासरू वडरत हाय ना कवाचं, त्याले जावू देना
मायपासी.
गोविंदा : आता त दुध कहाडलं तचि सोडतो ना. त्यो त धीरच नसते ना.
शांताबाई : ज्याचं जयते ना त्यालेच कयते… भुकेजलं असीन थे सोड त्याले.
(विराम) न कारे काल तुह्या घरातून जोरजोराचे आवाज येत व्हते. बायकोसंग
भांडत व्हता का? मारलं गिरलं का?

गोविंदा : बहीनमाय डोस्क्याले कचकच. हमेशा शक घेते. शकिला बानू भोपालीच
हाय माही बायको. आता शेतशिवारात काम करताने दुसर्‍या बायकासंग बला नाही
लागत का?
शांता : बलाव ना पन बायकोले खटकन न तिच्या कानावर काही जाइन असं नाही
बलाव.
गोविंदा : कामाचंच बलतो ना म्या. न थेबी व्हती ना गहु कापनीच्या कामावर.
आता थ्या डावर्‍याच्या झुलीले म्या भारा उचलुे मदत केली त चुकलं का माहं?
लेकीवानी हाय थे माह्या…
शांता : आता सोकारी म्हून तुले हे सारं कर्‍याच लागीन म्हना पन जरा सांभायून
तुमच्या मान्सायचा काही भरवसा नसते.
गोविंदा : हे बरं हाय बहीन, आलं गेलं मान्सायलेच पावलं… थेबी हेच म्हनत व्हती.
मान्सायले काही लाज, शरम, मर्यादा नसतेच. बेछूटच असतेत ना. न बायका
धुतल्या तांदयाच्याच असते. जवा कराचे तवा नाही केले न आता या वयात करनार
हाव का म्या लफडे? मालकीन तू पाह्यत हाय ना मले लहानपनापासून?
शांता : होव, आता सुशीलालेबी समजवाच लागीन. आमी बायका सुताचा साप
करतो.
गोविंदा : न बलला नवरा कोन्या बाईसंग त लगेच तिच्या लेकाचा बाप करतो.
शांता : बास, बास आता थोडं तुह्या बाजुनं बलली त सुटलाच…
गोविंदा : खरंच हाय, कोन्चीबी केस घ्या बायका हीतभर्‍याचा सरप हातभर्‍याचा
करतेत का नाही त पहा…
शाता : गप्प राह्य थे रेखी इकडंच येतानी दिसत हाय न लडतबी हाय…
गोविंदा : म्हंजे आज वामन्याचं काही खरं नाही. आलीच ना थे हातपाय आपटतच!
(रेखीच्या धायमोकलून रडण्याचा आवाज)
शांता : आता असी काहून लडतं? काही सांगसीन का नुसती लडाले आली माह्या
घरी?
रेखी : बरबाद झाली म्या… सत्यानास झाला माहा.

गोविंदा : झालं सुरू… वामन्यानं टीव्ही सिरीयलमंधल्या बाईकडंबी टक लावून
पाह्यलं असीन त हिच्या जिंदगीचा सत्यानास झाला…
शांता : तू गप राह्यना गयबान्या? अजूक तिनं तसं काही म्हनलं हाय का?
गोविंदा : अस्या पद्धतीनं एखांदी बाई हातपाय झाडत लडत न तिच्या जिंदगीचा
सत्यानास व्हते तवा असंच काही असते.
रेखी : शांताताईऽऽ दोन लेकरं हाय हो पोटी… आता मी कोनाले कसं तोंड दाखवू?
शांता : थोडी शांत हो न का झालं थे सांग. गोविंदा हिले पानी आन बरं…
गोविंदा : ते येतानी दिसली तवाच म्या पानी आनून ठिवलं व्हतं, एक्सपीरीयन्स
हाय ना आपल्याले. हप्ताले एकतबी केस तुह्याकडं असी येतेच ना.
शांता : दमान पे पानी… हं आता सांग का झालं?
रेखी : का सांगू न कोन्या तोंडानं सांगू? आपल्या घरची इज्जत घरात ठेवावं न
नवरा कसाबी असन त तेच्या दारात मराव…
गोविंदा : मंग अठी कायले आली? मरा..
(त्याला रोखत)
शांता : गोविंद्या… गप राह्यसीन का? हं सांग बाई…
रेखी : मी काहीच नाही सांगत. इतलंच का आता मले त्या घरात जागा नाही. लेकरं
साळेतून आले का म्या जातो बापाकडं, निरोप देल्ला मोबायलवर भावाच्या. तवरीक
तुह्याकड राहु दे.
शांता : आता इतलं सारं करुनच आली त मंग माह्याकडं कहाले आली? आपल्या
गावाचा मामला होता. तुह्या भावाकडं नेन्याचा काही संबंन नोता ना. आता नेला
त्याच्याकडं त माह्याकडं कहाले आली? न का झालं थेबी नाही सांगत बराबर.
रेखी : महा काही शक नाही, माहा तसा शकिला स्वभाव बी नाही पन आता धडडीत
पुरावाच हाती आल न यायले इचारलं त हे माह्या आंगावर धावून आले. पुरुश असे
करते तवा त्यायचा जीव जडला राह्यते दुकरीकडं… (पुन्हा हंबरडा फोडते)
शांताताईऽऽऽ म्या कायचयातच न कुठीच कमी पडली नाही हो… जवा म्हनानं
तवा…
गोविंदा : आता हे सांगाची काही गरज?

रेखी : जवा म्हनानं तवा न जे म्हनतीन थे करुन खाऊ घातलं…
शांता : आता का झालं?
रेखी : मी नाही सांगत, तुमी त्याहीलेच इचारा थ्या राधाक्काकडं जावून शेन काहून
खाता त…
गोविंदा : नाहीच सांगत म्हनत सारन सांगून टाकन्याची हे स्टायल मस्तच असते
या बायकायची.
शांता : तू गप राह्यत का… (हसू मात्र तिलाही आवरत नाही)
रेखी : मले वाटलंच होतं ना सार्‍यायले माहं म्हननं खोटं वाटन, म्हूनच म्या
सांगत नोती. शांताताई तलेबी यायच्यावरच इस्वास हाय ना? माह्यासारकी बाई
असी लडत येते त्याचा काहीत अर्थ असीन का नाई?
शांता : तुहं खोटं नाही वाटत मले पन नेमकं झालं का थे समजून घ्या लागीन.
कौतिक : मी वामन्याले आनू का बलावून?
शांता : कवतीक, तू कवा आला?
कौतिक : आता रेखावह्यनी लडत येतानी दिसल्या मले त आलो ना तवाच. आता
रातच्या टायमाले वह्यनी लडते म्हंजे वामन्यानं काही लफडा केलाच असीन…
रेखीन : पहा, भावजीलेबी मालूम हाय लफडा म्हनत हाय थे..
गोविंदा : थो त्या अर्थानं नाही म्हनत.
रेखी : काही भावजी इतल्यात हे कुठी जातेत न का करतेत हे तुमाले मालूम
असीन ना? आता थ्या राधाक्काकून पान बलावन्यापावतर मजल गेली यायची.
कौतिक : हव ह्या जाते तिच्याकडं रोजच म्हंजे बर्‍याचदा जाते, बहीन हाय म्हनग
त आपूनबी म्हनलं का असीन बा…
रेखी : थे तसी बाई बहीन असीन का यायची?
शांता : रोज जाते तिच्याकडं ह्या वामन?
रेखी : आताबी तिकडंच गेले हायत इतला धिंगाना होऊनबी. इतल्या रातीले.
शांता : होव, थे राधाक्का म्हंजे घरंदाज रखेलच… इजारदार गेले शह्यरात न
कोठ्यावर गानारी हे हिले आनलं इकडं उचलून…

कौतिक : सोता गेला मरुन अ‍ॅक्सीडेंटमंध न बाई राह्यली अठीच. विधवा हाव
म्हनते.
गोविंदा : पन गानं मस्त म्हनते. कोठ्यावर नसती त सिनम्यात गानं म्हनलं
असतं तिनं…
कौतिक : तुनं कवा आयकलं तिचं गान?
गोविंदा : शेतातून येतानी वाड्याजवयून सांजेले मस्त सूर आयकाले येते.
शांता : गानं चांगलंच म्हनते मचहना थे. शास्त्रीय संगीत सिकली हाय न तसी
खानदानी वाटते. म्हंजे इमामदार गेले तवापासून कोन्या पुरुषासंग नाव नाही
आयकलं. असंतसंबी नाही आयकलं…
गोविंदा : होव ना, धनराज पाटील गेला होता म्हने ज्यमवून पहाले त झाडला म्हने
त्याले बाईनं… लगीन नसनं केलं इमानदारासंग पन त्याहीच्याच नावानं कुकू लावलं
म्हने, त्याहीच्यासिवा दुसरयाचा इचारही मनात नाही येत म्हने…
रेखी : सती सावित्रीच हाय ना म्हून यायच्यासाटी पान पाठुलं ना रातीच्या
टायमाले…
शांता : आता हे पानाची का भानगड हाय न तुले इतला हंगामा कर्‍याची गरज
कामून पडली रातीच्या टायमाले?
रेखी : म्या काही खोटा आय नाही घेतला. आमचे जेवनं झाले. यायनं तमाखू
खाल्ला न कुपापासू जावून कोनाले का सांगलं त मालूम नाही पन थोड्या येळानं थे
गंथाडी येलमी बुडी यायच्यासाटी पान घेऊन आली. राधाक्काकून आनलं म्हने.
आता याचा अर्थ का? आता हे माह्यासमोर तिले उसनं अवसान आनून इचारत
होते का राधाक्काकून कहाले पान आनलं? तिनं काहून पाठवलं? त थे मचहने पान
देल्लं न राधाक्का लडत होती त याहीचा जीव कासावीस झाला तिच्यासाटी… लगे
निंघाले ना चपला घालून एवढ्या राती थ्या परक्या बाइकडं…
कौतिक : बापरे का! वामन्या इतला वाया गेला? हो, जाए तो थ्या बाईकडं पन मले
असं नोतं वाटलन. म्हन?न असू सकते बहीन थे बाई कोनाची. वाल्याचा वाल्मीकी
होत असते…
शांता : आता तिले भडकवू नोको. तू त्याले त्या पानाबद्दल इचालं नाही का?

रेखी : इचारलं त भडकले ना माह्यावर. आजवर आपल्या आईसाटीबी माह्यावर
ओरडला नोता ह्या मानूस असा न आज त्या बाईसाटी हात उगारला माह्यावर…
(पुन्हा हंबरडा फोडते)
गोविंदा : बहीनमाय लडऽऽतेऽऽ
कौतिक : मारलंबी असी वामन्यानं, आता वह्यनी सांगत नाही. भारतीय स्त्री…
(रेडी परत जोरात हंबरडा फोडते)
गोविंदा : लडऽऽतेऽऽ
शांता : कौतिक, गोंद्या… वेळ का वखत का न तुमी फालतू धंदे करता? रेखी
वामन्यानं तुले मारलन का?
रेखी : आता मारलं असतं त परवडलं असत ना…
गोविंदा : मारलं का याचं हे खास बायायनं द्याचं उत्तर असते. नाही मारलं असं
नाही म्हनत.
रेखी : इतले रागावले का हात त उगारल्यावानीच वाटला ना.
गोविंदा : म्हंजे हातबी नाही उगारला त्यानं.
रेखी : घान घान शिव्या देल्ल्या…
कौतिक : वह्यनी तुमी लयच सह्यन करता बा…
रेखी : आता नाही करनार, आता नाही करनार.
कौतिक : डोळे पुसा वह्यनी…
(ती परत जोराने रडू लागते)
गोविंदा : लडऽऽतेऽऽ
शांता : तुमी दोघंबी आपले हे धंदे थांबवान का?
रेखी : रातभर थांबू द्या मले न मंग मी सकायी जातो भावाकडं मोबायलवर सांगतो
त्याले.
शांता : मंगा त म्हनली ना का मोबायलवर सांगलंबी म्हून.
गोविंदा : आता मोबायलमंद बॅलन्स कौन भरुन देते?
रेखी : माहा भाऊच मारते रीचार्ज, मले आलं ध्यानात नवर्‍याच्या पयस्यानं त्याचे
गरञहाने नाही करत म्या माहेरच्याकडं. मांग यायनं मोबायल कहाले पाह्यजेन तुले

असं इचारलं त भावबिजेले भावानं मले हँडसेट दिला न मंग थोच रीचार्ज मारुन
देते.
गोविंदा : हा मोबायल पायी त संसार धोक्यात आले हायत. आता त या बायायले
शिक बी आली त आदी आईले फोन करुन सांगतेत ह्या. सासुनं रागानं पाह्यलन
तबी दुसर्‍या सेकंदाले मायले सांगते, लयच छळ हाय माहा ह्या घरात…
कौतिक : हो, पेशन्स नाही राह्यला मोबायलपायी. आपल्या घरी आपल्या बायकोनं
भाजी का कर्‍याची हे गावाले असनारी आपली सासु ठरवा लागली ह्या
मोबायलपायी.
रेखी : म्या काही अजूक सांगलं नाही पन आपला का फयसला व्हते थे सांगा न
मंग तुमी म्हनानं तसं म्या करनार हाव.
कौतिक : आता राधाक्का सारक्या बाईनं रातीले पान पाठवाचं न बायकोनं
तेच्याबार्‍यात इचारल्यावर सोन्यावानी बायकोच्या अंगावर हात उगारत नवरा त्या
बाईकडं जाते इतल्या रातीले येचा अर्थ सरय हाय…
गोविंदा : आमी थ्या मान्सावर जयतो. जे आमाले नाही ज्यमलं थे त्याले ज्यमलं
म्हून…
(रेखी परत रडू लागते) गोविंदा : लडऽऽतेऽऽ
शांता : अरेऽऽऽ थांबान का नाही आता? कौतिक तिले भडकवू नोको. मले माहीत
हाय का तू हमेशा त्या कौतिकचा खेदा खातं पन आता तो टायम नाही.
कौतिक : म्या सीरीयसलीच बलत हाव ना.
रेखी : कौतिकभावजी बराबर बलले. प्रकरन सरय हाय. यायचं त्या बाइसंग
काहीतबी प्रकरन हाय.
गोविंदा : मले नाही वाटतं. कौतिकचा भरवसा त देतोच मी पन त्या राधाक्काचा
ज्यादा देतो.
रेखी : होव म्हून थे पान पाठुते रातीले न थे रडत हाय हे समजल्यावर बायकोच्या
लडन्याकडं दुर्लक्ष करुन तुमचे वामनभाऊ त्या बाइकडं जाते एवढ्या रातीले.
गोविंदा : आता त्या एलमी बुडीले आयकाले कमी येते. तेच्यापाई थे का का धिंगाने
करुन ठेवते.

रेखी : पन अठी तिच्या आयकन्याचा संबंनच नाही. तिच्या हातानं पान पाठुलं थ्या
बाईनं… आता रोजच पान येते पन ते थो आमचा इस्नू आनते.
कौतिक : इस्नूत काकाच्या पानठेल्यावरुन आनते पान…
शांता : मले त बुडीचा काहीतबी घोय वाटते. इस्नू नोता का आज?
रेखी : नोता म्हून त माह्या ध्यानात हे पानवाले भानगड आली. त्या बुडीनं पान
आनून माह्याच हातात देल्ल न सांगलं का राधाक्काकून पान आनलं न पान
देल्ल्यावर थे लडत होती.
गोविंदा : कमी आयकाले येते म्हून या एलमी बुडीनं मांग पाटलाच्या लेकीच्या
बार्‍यातबी धिंगाना करुन ठिवला होता.
शांता : का झालं व्हतं?
कौतिक : होव, पाटलाची दहव्या वर्गात सिकनारी संध्या हाय ना थे पडली आजारी.
ओकार्‍या व्हा लागल्या. आपला आयुर्वेदीक डागदर नाही का सिंगनापुर्‍या
तेच्याकडं नेलं.
गोविंदा : तेनं औसीध देल्ल पन पाटलाच्या नोकराले आठवेच ना का कसं घ्याचं
म्हून थो पुना इचाराले गेला डागदरले त डागदर हिरीचं पानी कहाडत व्हता. यानं
दूरुनच इचारलन त डागदरनं याले आयकाले जात नोतं म्हून अ‍ॅक्शन करुन सांगलं
का आल्याच्या रसात दोन गोया घ्याच्या उलटीसाटी…
कौतिक : न या बडुनं थे दूरुन आयकलं, अ‍ॅक्शन पाह्यली न गावभर पसरवलं का
पाटलाच्या लेकीचं पोट आलं, दोन दिवस गेले.
शांता : मंग आज वामननं तिले पान सांगलं का तिनंच आनून देल्लं?
कौतिक : मजाक जावूद्या पन मलेबी वामन तसा नाही वाटत न थे बाईबी. हे बुडी
हाय ना तिले हाय गुटखा खान्याचा शौक, म्हून थे कोनालेबी पान आनून देऊ काल
खर्रा आनू का, असं इचारते न मंग त्याचं पान आनून देतानी आपलीबी एक
गुटख्याची पुडी ज्यमोते.
रेखी : त थे राधाक्का का पानठेला चालोते का? न थे रडत हाय हे समजल्यावर हे
कायले गेले धावून?
कौतिक : आता थे तो आल्यावरच समजीन.

शांता : आना बलावून त्याले.
रेखी : आता थे रात तिकडंच काढतीन ना.
कौतिक : का वह्यनी आजवर असं केलन का त्यान? न मंगा दिसला बी मले तो
घरात जातानी. याचा अथ वापस आला तो दहा मिनिट झाले.
शांता : गोविंदा बलावून आन त्याले.
गोविंदा : हिले घरात नाही पाहून थोच येत हाय इकडं…
शांता : थो आल्यावर तेच्यावर सारे तुटून पडू नोका. मी इचारतो त्याले का हाय
त…
वामन : हं, चाल, झाला तितला तमाशा लय झाला. घेनं न देनं फुकट कंदी लावन.
शांता : झालं हा थेत समजन का आमाले?
वामन : सांगलं असी ना हिनं न इस्वासही बसला असीन तुमचा सार्‍यायचा. आता
का हिच्यासारखी सात्त्वीक बाई लडते म्हनल्यावर सारेच इस्वास ठेवनार. मले
काहीच सांगाच नाही. तुमाले फैसलाच कर्‍याचा असीन त हिचं म्हननं खरं समजून
करा. मी गुन्हेगार हाव. लफडेबाज हाव न थे बाई त बाजारबसवीच हाय ना.
(दीर्घ विराम)
तुले चालाच असीन त चाल, नाहीत मंग मी जातो. थे घ तुह्या नावानं केलं हाय.
शेतीबी हाय. मी तिो जिकडं जाचं तिकडं, तू घर न गाव सोडून जावू नोको.
कौतिक : पन झालं का?
वामन : म्हंजे गुन्हेगार म्हून मी माही बाजू मांडाची ना?
शांता : तसं काहून समजतं? बहीन म्हून मली त सांगू सकते ना तू.
वामन : आता बहीनभावाच्या नात्यावर इस्वास कोन ठेवते? उद्या मी तुह्याबी घर
आलो न तू पान पाठुलं मले त तुहञयावर बी शक घेतील लोक.
शांता : म्हंजे थे राधाक्का तवायफ तुही बहीन हाय?
वामन : नसू शकते का? नसावं का? न थे तवायफ होती त्यालेबी आता पंधरा
साल होऊन गेले. इमानदारानं तिले आनलं, या वाड्यावर ठिवलं. तवायफ म्हूनबी थे
गानंच म्हनत होती. धंदा नोती करत. इमानदारासंग नवरा समजून इमानदार

राह्यली थे. आताबी थो मेल्यावर कुकू नाही लावत साज नाही चढवत. इधवेवानी
राह्यते. चवचाल बाई असती त दुसरा मानूस पकडला असता.
रेखी : पकडलाच ना…
वामन : असं बोलल्यावर चीड येते मानसाले न मंग म्हनाचं मारलं, ओरडले, शिव्या
देल्ल्या…
शांता : रेखी तू गप राह्य…
वामन : मी जातो त्या बाईकडं पन थे वयानं पंधराक साल मोठी हाय माह्यापेक्षा…
गोविंदा : वाटत नाही…
वामन : टाँट समजला मले पन तिच्याकडं गेल्यावर कईबी मले तिच्यातली बाई
नाही दिसली. जानवली. थे माह्यासी भावावानीच वागली. मी जातो थे ते गानं
म्हनते ते आयकाले. मले गानं सिकाचं होतं पन बाप गेला, शेतीत लागलो न गानं
अर्धच राह्यलं… म्हून जातो. थे म्हने वामनभाऊ तुमचा आवाज चांगला हाय. सराव
करा… बरं भजनं म्हनते थे.
गोविंदा : हो, हे खरं हाय. आता त दर गुरवावी वाड्यावर भजनाचा कारेकरमई
करते थे.
शांता : हे पानाचं प्रकरन का हाय?
वामन : आज इस्नू नोता म्हून त्या बुडीले म्हनलं काकाकून आपन आन. तिले
आयकाले गेल का आक्काकून आपन आन. थे गेली न राधाकञकाले सांगलं का
वामन पान मांगत होता. तिनं दिलं पन संग लिहून पाठवलं का आता माह्याकून
पान लागायला लागलं का?, याचा अर्थ की मी भावासारकं पाहीलं, मी कई तवायफ
होती याची जानीवई मले कई होऊ दिली नाही, अगदी चांगल्या घरचया बहीनीवानी
वागला न आता रातीले पान मांगवत माह्याकून, म्हंजे तवायफ कई चांगली बाई
होऊच शकत नाही… असं म्हनून थे रडत बसली. म्हून तिले समजवाले गेलो. काका
न आक्काचा घोळ या बुडीनं घातला तो निस्तरुन आलो. हिचं मले माहीत होतं का
शाताताईच्या घराकडं धाव घेऊन. आल्यावर समजावू, नाही समजली त तिचं
नसीनब तिच्याकडं…
रेखी : खरंच सांगत हात ना तुमी?

गोविंदा : आताबी इचार खरं का थे. अरे बावा म्या बी जातो गुरुवारच्या भजनाले
राधक्काकडं. खरंच चांगली बाई हाय थे. इमानदाराचा सारा कुळाचार करते थे बाई.
अखजीले त्याचे लेकरं नाही पान वाढत

गोविंदा : आताबी इचार खरं का थे. अरे बावा म्या बी जातो गुरुवारच्या भजनाले
राधक्काकडं. खरंच चांगली बाई हाय थे. इमानदाराचा सारा कुळाचार करते थे बाई.
अखजीले त्याचे लेकरं नाही पान वाढत त्याचं पन हे बाई वाढते. तिचं कोनीच
नाही. हा वाडा न शेती पुना थे इमानदाराच्या लेकाच्या नावानंच करुन जानार
हाय… ,
शांता : थे बाई चांगली असीन त कईतबी थे कोठ्यार गानं म्हनत होती म्हून तिले
आपल्यात नाही घ्याचं हे चुक हाय. वामननं पान मांगलं म्हून रडत होती थे बाई.
आता या गुरुवारी म्या जानार तिच्याकडं भजनाले न पौर्निमले माह्याकडच्या
भजनाले बलवून तिले. न रेखी तूबी चालजो…
रेखी : मले का मालूम असा घोय झाला म्हून. मी तुमच्या सार्‍यायसमोर यायची
नालस्ती करत रायली. कुठं फेडू हे पाप? (म्हणत परत रडू लागते.)
गोविंदा : लडऽऽतेऽऽ
(सगळे हसतात.)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.