नक्षलवादयांचा घातपाताचा कट उधळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश,साहित्य हस्तगत | Gadchiroli police force succeeds in foiling Naxal plot

Share This News

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली पोलीस उपविभाअंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केन्द्र कोटमी कार्यक्षेत्रातील कोकोटी जंगल परिसरात नक्षल्यांनी कॅम्प लावल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांचे नेतृत्वात विशेष अभियान राबविण्यात आले.या अभियानात विशेष कृती दल व पोमके कोटमीचे जवान सहभागी झाले होते.पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना घटनेच्या दिशेने गेले असता सकाळी ०९:३० वाजेच्या सुमारस कोकोटी गावाच्या उत्तरेला असलेल्या जंगल परिसरातील पहाडी भागात नक्षलवाद्यांचा कॅम्प असून संशयास्पद हालचाली दिसून आल्याने जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने मार्गक्रमण केले.जवान येत असल्याचे बघून जेवण बनविण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांनी प्लॉस्टिक शिट, स्वयंपाकाचे भांडे, भाजीपाला, राशन, पिण्याचे पाणी, चप्पल, जुते, कपडे, पिट्ट तसेच खुप मोठया प्रमाणावर असलेले जीवनावश्यक साहित्य सोडुन घनदाट जंगलाच्या दिशेने पळ काढला. जवानांनी सदर परिसरात शोध अभियान राबविले असता, पहाडीच्या पुर्व दिशेला ०१ व पश्चिम दिशेला ०१ असे दोन इलेक्ट्रीक वायर दिसुन आले.सदर इलेक्ट्रीक वायर वरुन नक्षलवाद्यांकडून घातपाताची योजना असावी असा संशय आल्याने बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडुन घटनास्थळाची तपासणी करण्यात आली.

नक्षलवादयांचा घातपाताचा कट उधळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश,साहित्य हस्तगत

त्यावेळी नक्षलवाद्यांनी घातपाताचे उद्देशाने १० किं.ग्रॅमचे दोन ब्लॉस्ट पुरुन ठेवलेल्याचे आढळुन आले. नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरुन ठेवलेला ब्लॉस्ट जमिनीबाहेर काढणे धोक्याचे असल्यामुळे बीडीडीएस पथकाकडुन जागेवरच नष्ट करण्यात आले.नक्षल्याच्या या कृत्याच्या विरोधात कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) भादंवि सहकलम ४,५ भास्फोका अन्वये सदर भागात सक्रीय असणाऱ्या कंपनी क्र.०४ चा कमांडर नामे प्रभाकर ऊर्फ रवि ऊर्फ प्रकाल वीर ऊर्फ पदकाला स्वामी ऊर्फ लोकेटी चंदर राव तसेच कसनसुर दलम डिव्हीसीएम व सहकारी नक्षलवाद्यांवर पोमके रेगडी विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.नक्षलविरोधात महत्वपुर्ण कारवाई करत नक्षलवादयांचा घातपाताचा कट उधळुन लावणाऱ्या जवानांच्या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक करीत नक्षलविरोधी अभियान, अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.