गडकरींनी केली कुरई घाटाजवळच्या चौपदरी रस्त्याची पाहणी

Share This News

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 हा महाराष्ट्र मध्यप्रदेश यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. हा महामार्ग तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. दाट जंगलातून हा महामार्ग जात असल्याने वन्य जीव प्राण्यांना या महामार्गामुळे अडथळा निर्माण हॉट होता. वन्यजीवांची सुरक्षितता लक्षात घेऊन या महामार्गावर 14 अंडरपास तयार करण्यात आले आहेत.केंद्रीय रास्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या बांधकामाची नुकतीच पाहणी केली व अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच दोन्ही बाजूंनी कोणताही अडथळा न येण्याकरीत नाइट बैरियर लावण्यात आले आहे अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी अधिकाऱ्यानि  ब्लॅक स्पॉट आणि अपघात बिंदू चिन्हात करून तेथे काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी इतक्या मोठ्या संख्येने अंडरपास तयार करण्याचा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. 
या प्रकल्पाचे उर्वरित काम मार्च अखेरीस पूर्ण केले जाईल. मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर खवसा ते मोहगाव असा हा चौपदरी मार्ग पूर्ण झाल्याने नागपूर ते रीवा असा 15 तासाचा प्रवास 8 ते 9 तासात पूर्ण होईल.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.