रेमडेसिव्हीरसाठी गडकरींची सर्वांत मोठ्या कंपनीशी चर्चा

Share This News

नागपूर: महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सक्रिय झाले आहेत. कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात आली आहेत.
नितीन गडकरी यांच्या विनंतीवरून ‘मायलन इंडीया’ने तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपूरला पोहोचते केले आहेत. लवकरच दुसरी खेप पाठवण्याचे आश्वासनही दिले आहे. मायलन इंडिया ही ‘रेडेसिवीर ‘ इंजेक्शन उत्पादन करणारी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.