धावत्या मेट्रोत जुगार, मेट्रो प्रशासन कारवाईच्या तयारीत

Share This News

नागपूरची शान म्हणून मिरवणाऱ्या माझी मेट्रो मध्ये चक्क जुगार खेळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे कमावण्याच्या मेट्रोच्या या अतिरिक्त योजनेवरच यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे.

हजारो कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मेट्रोला प्रवासी मिळत नसल्याने मेट्रो कडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत,मात्र मेट्रोचे हेच प्रयत्न आता त्यांच्या अंगलट आले आहेत. धावत्या मेट्रोत केवळ तीन हजार रुपये खर्च करून कुणाला ही वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस सह अनेक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जाते. असाच एक कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता,या मध्ये अक्षरशः क्लब भरवण्यात आला होता,ज्यामध्ये पोल डान्स आणि जुगार भरवण्यात आला होता.

नागपूरात धावत्या मेट्रो मध्ये काही लोकांनी अक्षरशः डान्सर वर पैसे उडविले, जुगार खेळले. या प्रकरणी मेट्रो ने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. घडलेल्या प्रकारात शेखर शिरभाते नावाच्या व्यक्तीने वाढदिवसा साजरा करण्यासाठी मेट्रोच्या सेलिब्रेसशन ऑन व्हील या उपक्रमाअंतर्गत मेट्रो एक तासा करिता भाड्याने घेतली होती. नंतर त्यांनी आणि काही पाहुण्यांनी मेट्रो मध्ये थिल्लरपणा करणे सुरू केला. डान्सर कडून अश्लील डान्स करवले गेले, त्यांच्यावर पैसे उडविले गेले. या सेलिब्रेशनचे व्हिडीओ वायरल झाल्यानंतर मेट्रो प्रशासनात खळबळ माजली आहे.

मेट्रो कडून कारवाईचे संकेत

याप्रकरणी मेट्रो सखोल चौकशी करणार असल्याचं ठरवलं आहे. नियमांचा भंग करणाऱ्या अशा व्यक्तीना कायम स्वरूपी प्रावस बंदी टाकण्याबाबत ही विचार केला जाणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी दिली आहे. या पुढे सेलिब्रेशन ऑन व्हील उपक्रमासाठी जास्त रक्कम डिपॉसीट म्हणून घेतली जाणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.