दरोडेखोरांच्या टोळीला यवतमाळमध्ये अटक Gang of robbers arrested in Yavatmal

Share This News

यवतमाळ : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहर पोलिसांचे पथक मध्यरात्री धामणगाव मार्गावर पेट्रोलिंग करीत असता धामणगाव बायपास ते कळंबकडे जाणाऱ्या मार्गावर अंधारात एक संशयित गाडी दिसून आली. गाडीची पाहणी केली असता दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले. पोलिसांनी गोविदसिंग टार (हिंगणा, नागपूर), अफसर मुझफर शेख (नागपूर), निलेश सोनवणे (अमरावती), विकास चव्हाण (यवतमाळ), शुभम घोंगडे (यवतमाळ), प्रेमदास नगराळे (यवतमाळ), मोहित जेकब (यवतमाळ), वैभव घोंगडे (यवतमाळ) यांच्यावर गुन्हे नोंदवून अटक केली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.