दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक पदी गौरी मराठे

Share This News

नागपूर: दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक या पदावर आकाशवाणीच्या सहाय्यक संचालक वृत्त श्रीमती गौरी मराठे पंडित यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नव्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रात श्रीमती मराठे यांची कडे प्रशासन व लेखा विभागाची जबाबदारी राहणार आहे. नागपूर आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागाचे प्रमुख म्हणून यापूर्वी त्या कार्यरत होत्या .भारतीय प्रशासकीय माहिती सेवेत अधिकारी या पदावर निवड झाल्यानंतर श्रीमती मराठे यांनी पुणे व नागपूर येथे आकाशवाणीच्या वृत्त विभाग यशस्वीपणे सांभाळला आहे . मागील अडीच वर्षापासून आकाशवाणी नागपूर केंद्राच्या वृत्तविभागात त्या कार्यरत होत्या त्यांना माहिती सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.