गडचिरोली : दारूसह १0 लाखांचा गुळ-मोहाचा सडवा जप्त

Share This News

आष्टी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या तुंबडी नाला जंगल परिसरात काही इसम अवैधरित्या हातभट्टी लावून मोहा दारू गाळीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सदर लंगल परिसरात काल १४ डिसेंबर रोजी शोधमोहीम राबविला असता ५0 रूपये किंमतीची गुळा मोहाची दारू व ९ लाख ६0 हजार रूपये किंमतीचा ४८ ड्रम मधील गुळा मोहाचा सडवा असा १0 लाख १0 हजारांचा मुद्देमाल जप्त केली. मात्र घटरावस्थळावरून आरोपी फरार झाले. नेपाल हजारी मिस्त्री रा. गुंडापल्ली, उत्तम खोकन मिस्त्री रा. आनंदग्राम ता. चामोर्शी असे फरार आरोपींची नावे आहेत.
चामोर्शी तालुक्यातील गुंडापल्ली येथील ठोकदारूविक्रेते नेपाल मिस्त्री, उत्तम मिस्त्री हे अवैधरित्या तुंबडी नाला जंगल परिसरात हातभट्टी लावून मोहा, गुळाची दारू गाळीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर जंगल परिसरात काल १४ डिसेंबर रोजी शोधमोहीम राबवित असताना तुंबडी नाला जंगल परिसरात हातभट्टी लावून मोहा दारू गाळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र दारू गाळणार्‍यांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. पोलिसांनी सदर जंगल परिसरात पाहणी केली असता ५0 हजार रूपये किंमतीचे प्रत्येकी ५0 लीटर क्षमतेचे ५ पॉस्टिक कॅनमध्ये २५0 लीटर गुळा मोहाची दारू, व ९ लाख ६0 रूपये किंमतीचे २00 लीटर क्षमतचे ४८ नगर प्लास्टिकच्या ड्रम मधून ९ हजार ६00 किलो गुळा मोहाचा सडावा असा एकूण १0 लाख १0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. फरार आरोपी नेपाल हजारी मिस्त्री रा. गुंडापल्ली, उत्तम खोकन मिस्त्री रा. आनंदग्राम ता. चामोर्शी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक विक्रम सगणे, सहायक फौजदार दादाजी करकाडे, पोलिस हवालदार निलकंठ पेंदाम, पोलिस नाईक शुक्रचारी गवई, पोलिस शिपाई सुनिल पुठ्ठावार, मंगेश राऊत, महिला पोलिस शिपाई भारती बाचावार, चानापोशि शेषराव नैताम यांनी केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.