करोना चे संकट पाहता, नववर्षाचे स्वागत यासाठी राज्य सरकारची नियमावली

Share This News

नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सगळीकडे जल्लोष केला जातो परंतु यावर्षी करोना चे संकट पाहता राज्य सरकारने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांना नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 31 डिसेंबरची रात्र व नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारीसाठी या मार्गदर्शक सूचना लागू राहणार आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच 5 जानेवारीपर्यंत राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

अशा आहेत मार्गदर्शक सूचना —

नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरी राहूनच नववर्षाचे स्वागत करावे
समुद्र किनारे,बागेत अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र न येता सुरक्षित अंतर,मास्क व सॅनिटायजर चा वापर करावा
60 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाणे टाळावे
कोणतेही धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व मिरवणूक काढू नये
नववर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जातात,अशावेळी त्या ठिकाणी सुरक्षित अंतरासह खबरदारीचा उपाययोजना कराव्या

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.