गोदरेज अप्लायन्सेसने सुरु केले २९ वे गोदरेज दिशा एक्सेलेन्स सेंटर Godrej Appliances launches 29th Godrej Disha Excellence Center

Share This News

मुंबई, १२ मार्च : गोदरेज ग्रुपमधील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने आपले बिझनेस युनिट व घरगुती उपकरणांची भारतातील आघाडीची कंपनी गोदरेज अप्लायन्सेसने तांत्रिक प्रशिक्षणासाठीचे आपले २९वे एक्सेलेन्स सेंटर मॉन्टफोर्ट अकॅडेमीच्या सहयोगाने गोव्यामध्ये सुरु केल्याची घोषणा केली आहे. युवकांना दर्जेदार तांत्रिक कौशल्ये आणि रोजगाराभिमुख व्यापारांचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण युवकांना सक्षम करण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी ब्रॅंडने हे पाऊल उचलले आहे. ‘गोदरेज दिशा’ या व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमांतर्गत एक्सेलेन्स सेंटर सुरु करण्यात आले आहे. सरकारच्या राष्ट्रीय कौशल विकास अभियानाला अनुसरून भारतातील वंचित वर्गातील युवकांना कुशल रोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणणे या उपक्रमाचे उद्धिष्ट आहे. 


 मॉन्टफोर्ट अकॅडेमी ही प्रमुख शैक्षणिक संस्था गेली २३ वर्षे उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. नव्या सेंटरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, गोव्यातील वंचित समुदायांमधील युवक आणि गोदरेज अप्लायन्सेसच्या एएसपी टेक्निशियन्ससाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील. हे प्रशिक्षण कार्यक्रम १५ दिवसांपासून ३ महिन्यांपर्यंतचे असतील. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव ओव्हन आणि एअर कंडिशनर दुरुस्तीची माहिती करवून देण्याच्या दृष्टीने त्यांची रचना करण्यात आली आहे. 
 गोव्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. प्रमोद जी सावंत यांच्या हस्ते नवीन एक्सेलेन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोदरेज अप्लायन्सेसचे रिजनल सर्व्हिस मॅनेजर श्री. ग्रेगरी के पॉलोज व मॉन्टफोर्ट अकॅडेमीचे प्रोव्हिन्शियल सुपरवायजर फर. रोलँड कोएल्हो एसजे उपस्थित होते. प्रशिक्षणाचा कन्टेन्ट आणि अभ्यासक्रम यांच्या व्यतिरिक्त एक्सेलेन्स सेंटरला गोदरेज अप्लायन्सेसकडून साधने, उपकरणे, सुटे भाग आणि उपकरणे या स्वरूपात देखील सहयोग पुरवला जाईल. 
यावेळी गोदरेज अप्लायन्सेसचे सर्व्हिस विभागाचे नॅशनल हेड श्री. रवी भट म्हणाले, “आपल्या उद्योगक्षेत्रात तंत्रज्ञानात लक्षणीय बदल होत आहेत आणि ग्राहकांच्या अपेक्षा सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कुशल तंत्रज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल. महामारीमुळे गेल्या वर्षी देशभरात रोजगार संधींवर खूप परिणाम झाला आहे. सामाजिक जबाबदारीचे पुरेपूर भान असलेले कॉर्पोरेट या नात्याने आम्ही हे संलग्न कार्यक्रम सुरु केले आहेत, रोजगारक्षमता निर्माण करणे आणि उमेदवारांमध्ये उद्यमशीलतेचा अंतर्भाव होण्यात मदत करण्यावर यामध्ये भर दिला जातो. २०२० पर्यंत आम्ही अप्लायन्स उद्योगक्षेत्राला ६५००० पेक्षा जास्त कुशल युवक देण्याची कामगिरी यशस्वीरीत्या बजावली आहे. आमच्या ‘दिशा’ उपक्रमाच्या माध्यमातून वंचित वर्गातील युवकांवर भर देत रोजगारक्षमतेतील कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो.” 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.