‘गोदरेज इंटरिओ’तर्फे हॉस्पिटल बेड्सची ‘अक्युरा’ श्रेणी सादर Godrej interio series

Share This News

मुंबई, २७ जानेवारी, : घरगुती व संस्थागत फर्निचरच्या क्षेत्रात भारतात आघाडीवर असलेल्या ‘गोदरेज इंटिरिओ’ या ब्रॅंडने रुग्णांसाठी वापरावयाच्या खास ‘प्लॅटफॉर्म बेड’ची अनोखी श्रेणी सादर केली आहे. गोदरेज समुहाची प्रमुख कंपनी ‘गोदरेज अँड बॉइस’ या कंपनीने याबाबतची घोषणा केली. ‘अॅक्युरा’ या नावाची ही नवीन श्रेणी हॉस्पिटल बेड्ससाठीची एक अनोखी संकल्पना आहे. यामध्ये ग्राहक आपल्या मॅन्युअल स्वरुपातील ‘अॅक्युरा बेड’चे रुपांतर ‘मोटराईज्ड’ स्वरुपात करू शकतात. शहरी आणि ग्रामीण भारतातील रुग्णालयांमध्ये कार्यक्षम, योग्य पायाभूत सुविधांची गरज आहे, हे लक्षात घेऊन ‘गोदरेज इंटरिओ’ ब्रॅंडने ही नवीन श्रेणी सादर केली आहे.  आरोग्य आणि तंत्रज्ञान यांची गुंतागुंत असलेल्या परिसंस्थेच्या समस्या सध्या जगभरात भेडसावत आहेत. त्याचबरोबर, रूग्णांचे संख्याशास्त्र बदलत असून आरोग्यसेवेचे खर्चही वाढत आहेत. या कारणांमुळेच आरोग्यसेवेतील भागधारकांनी आरोग्यसेवेच्या नाविन्यपूर्ण संकल्पना मॉडेल्स, प्रगत तंत्रज्ञान, चांगली उपकरणे आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यातून अनपेक्षित साथीच्या आजारांपासून बचाव करणे व निरोगी जगाची निर्मिती करणे यासाठी जग सज्ज होऊ शकेल. 
 भारताची आरोग्यसेवेची व्यवस्था परिवर्तनाच्या मार्गावर आहे, असे दिसते. त्यात काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत, तसेच त्यामध्ये काही गंभीर उणीवादेखील आहेत. भारतीय आरोग्यसेवेमध्ये आव्हानात्मक ठरणाऱ्या काही मुद्द्यांमध्ये, पायाभूत सुविधांचा अभाव आणि निधीची कमतरता यांचा समावेश होतो. या समस्यांचे निराकरण म्हणून ‘अॅक्युरा हॉस्पिटल बेड्स’ सादर करण्यात आले आहेत. स्पेसिफिकेशन्सप्रमाणे बेड तयार करता येणे आणि परवडणारे दर ही याची वैशिष्ट्ये आहेत. 
 नवीन उत्पादनाच्या सादरीकरणाप्रसंगी ‘गोदरेज इंटरिओ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माथुर म्हणाले, “सर्वजणांचे जीवनमान दररोज समृद्ध करण्याचे ‘गोदरेज इंटरिओ’चे ध्येय आहे. भारतीय आरोग्यसेवेची व्याप्ती, त्यातील सेवा आणि खासगी कंपन्या व सामान्यजनांकडून या क्षेत्रात होणारा खर्च या सर्व बाबी मोठ्या वेगाने वाढत आहेत; तथापि, खर्चाची गणिते सांभाळताना रुग्णांना सुखसोयी व सुरक्षा पुरविणे याकडे लक्ष देण्याचे वातावरण आपल्याकडे नाही. आरोग्यसेवा क्षेत्रासमोर असणारी अनन्य आव्हाने लक्षात घेऊन अनेक नवकल्पनांवर आम्ही ‘गोदरेज इंटिरिओ’मध्ये काम करत आहोत. बेड्सची ‘अॅक्युरा’ श्रेणी ही त्याचे चांगले उदाहरण आहे. ग्राहकाला या श्रेणीमधील अनेक पर्यायांमधून निवड करुन आपल्या गरजेनुसार बेड तयार करता येतो आणि तो मॅन्युअल पद्धतीतून मोटराईज्ड स्वरुपात रुग्णालयाच्या आवारात रुपांतरीत करता येतो. काही काळानंतर हाच बेड अपग्रेड करणेही रुग्णालयाला शक्य होईल. अनेकविध नवकल्पनांच्या माध्यमातून आरोग्यसेवांमधील अनुभवाची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, ही ‘गोदरेज इंटिरिओ’च्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.” 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.